गोदाकाठच्या गावातील लोकांची बिकट अवस्था,11 गावांचा संपर्क तुटला…

0

वेगवान न्यूज / केशव मुबीड/परभणी,सोनपेठ – रस्त्यासाठी विधानसभेच्या निवडणूकीवर कडकडीत बहीष्कार टाकणारी गावे पुन्हा संपर्काच्या बाहेर गेली असुन नागरीकांना बाहेर पडण्यासाठी कंबरे ईतक्या पाण्यातुन चालत यावे लागत आहे.

रस्त्याच्या दुरावस्थेसाठी प्रसिद्ध असलेल्या सोनपेठ तालुक्यातील नागरीकांचे रस्त्यासाठीचे हाल सुरुच आहेत. या वर्षी झालेल्या पहिल्या चांगल्या पावसाने गोदाकाठच्या नागरीकांचे हाल पुन्हा सुरु केले आहेत. शेळगाव रस्त्यावरील नाल्यात पाणी आल्याने गोदाकाठच्या थडी उक्कडगाव,वाडी पिंपळगाव,थडी पिंपळगाव, गंगा पिंपरी ,गोळेगाव ,लोहीग्राम या गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क पुन्हा तुटला आहे. कोरोना सारख्या संकट काळात ही गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेली आहेत.

दिवाळीत झालेल्या अवकाळी अतीवृष्टीमुळे ही गावे संपर्क विहीन झाली होती .त्या वेळी या अकरा गावातील तरुण मंडळाने पुढाकार घेऊन विधानसभेच्या निवडणूकीवर बहिष्कार घातला .

या गावात एकही मतदान झाले नाही. गावकऱ्यांच्या मोठ्या एकजुटी नंतर ही प्रशासन किंवा पदाधिकारी यांनी गोदाकाठच्या या गावांच्या मूलभुत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले .

दि ९ रोजी रात्री तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसाने गोदाकाठच्या गावांना तालुक्याशी जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर शेळगाव जवळ पाणी आल्यामुळे नागरीक अडकुन पडले . नागरीकांना कंबरे ए…वढ्या पाण्यातुन वाट काढत शेळगाव गाठावे लागले .

विधानसभा निलडणुकीवर बहिष्कारा सारखे आंदोलन करुन ही प्रशासनाला गोदाकाठच्या नागरीकांच्या समस्या सोडवता येत नसतील गोदाकाठचे नागरीक तीव्र आंदोलन करतील असा ईशारा गोदाकाठच्या नागरीकांनी माध्यमांशी बोलतांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here