जी मेलमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त l

0

नवी दिल्ली l भारत, अमेरिका, युरोपीय देशांसह सुमारे ४२ देशांतील गुगलच्या जी मेल यंत्रणेत जगभरात गुरुवारी दोन तास बिघाड झाला होता. त्यामुळे अब्जावधी लोकांची खूप पंचाईत झाली. ई-मेलद्वारे कोणत्याही अटॅचमेंट पाठविण्यास खूप उशीर लागत होता. त्यातच गुगल ड्राईव्ह आदी सेवाही चालत नसल्याने त्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे कामकाजही खोळंबले.

कोरोना साथीच्या काळात बहुतांश कार्यालयातील कर्मचारी घरूनच काम करीत आहेत. त्यामुळे त्यांचे सारे कामकाज इंटरनेट सेवा तसेच ई-मेल यंत्रणा व्यवस्थित सुरू असण्यावर अवलंबून आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून जी-मेल सुमारे दोन तास चालत नसल्याने असंख्य लोकांच्या कामकाजात अडथळे निर्माण झाले काही वापरकर्त्यांच्या मते गुगल ड्राइव्हवरून फाइल अपलोड करता येणे कठीण बनले होते.गुगलच्या कोणत्याच यंत्रणा चालत नसल्याने हताश झालेल्या नेटकऱ्यांनी त्यासंदर्भात सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली. मात्र, काही नेटकऱ्यांनी जी मेलच्या यंत्रणेत कोणताही बिघाड झाला नसल्याचा दावा केला.

गुगलच्या यंत्रणेत नेमका काय बिघाड झाला याबद्दल आमचे तज्ज्ञ शोध घेत आहेत. यंत्रणेत जो काही दोष निर्माण झाला असेल तो लवकरच दुुरुस्त केला जाईल, असे गुगलने म्हटले होते.

सकाळी कामाची सुरुवात असल्याने आलेली सर्व ई-मेल वाचली जातात. त्यापैकी कोणाला लगेचच उत्तर द्यायचे हे ठरविले जात. सुमारे दोन तास जी-मेल बंद असल्याने कामे खोळंबली होती.या बिघाडाचा तडाखा फिलिपिन्स, न्यूझीलंडसह अन्य ४२ देशांना बसला आहे, असे या समस्येचा वेध घेणाºया ट्रॅकिंग वेबसाईटने म्हटले आहे. जी मेल नीट चालत नसल्याने अनेकांच्या फाईल नीट अपलोड होऊ शकल्या नाहीत. मेलला अटॅचमेंट जोडली जाण्यास खूप वेळ लागत होता. तसेच जी मेलला लॉग इन होणे किंवा तेथून ई-मेल पाठविणे हीदेखील कामे करता येत नसल्याने वापरकर्ते निराश झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here