वेगवान न्यूज / समीर पठाण
लासलगाव l निफाड तालुक्यातील थेटाळे येथील ५४ वर्षीय महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या ४८ वर्षीय पुरुषास लासलगाव पोलिसांनी अटक केली असून या आरोपीस मा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार निफाड तालुक्यातील थेटाळे (सोनेवाडी रोड)येथील आरोपी रघुनाथ धोंडीराम शिंदे वय ४८ याने थेटाळे येथील ५४ वर्षीय महिलेस लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्यामुळे या फिर्यादी महिलेने या बाबत लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार या आरोपी विरुद्ध भा द वि कलम अंतर्गत ३५४(अ)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपीस अटक करून त्यास निफाड कोर्टात हजर केले असता मा न्यायालयाने त्यास ४ डिसेंबर पर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यातील पूर्व तपास अधिकारी स पो नी खंडेराव रंजवे यांच्या नंतर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स पो उ नि देविदास लाड हे करीत आहेत