जबरदस्ती किराया वसूल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा !

0

वेगवान न्यूज / केशव मुंडे

बीड –

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे अनेक व्यवहार बंद आहेत .बेरोजगारी मुळे तरुण काही उद्योग धंदा कण्याच्या हेतूने शहरात दुकाने किरायाने घेऊन आपला व्यवसाय सुरू करतात परंतु लॉकडाऊन मुळे सर्व व्यवसाय ठप्प झालेले आहेत या मुळे नवीन दुकानदारांना किराय भरणे शक्य नाही.

घरमालकांनी माणुसकी दाखवून किरायदारांना जबरदस्ती किराया वसूल करू नये. म्हणून प्रशासनाने जबरदस्ती किरायदारांना त्रास देऊन जबरदस्ती किराय वसूल करणाऱ्यांवर पोलीस कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात यावेत. असे आव्हान शिवसंग्राम विध्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,प्रशांत डोरले,विलास मस्के,सौरभ तांबे,हरीश शिंदे,शरद तिपले,गोविंद शिंदे,दादा घोरड,विजय डोके,रमेश जगताप,अजित दासवंते,लाटे तात्यासाहेब, मोहन गव्हाणे,संपत गव्हाणे, पांडुरंग घोडके, अशोक आढाव ,सचिन आमटे,राजू सय्यद,नानासाहेब आमटे,संजय तिपले,बाळासाहेब शेळके, सुधाकर काकडे,दिनेश आमटे आदींच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here