हाथरस प्रकरणातील त्या आरोग्य कर्मचारी,पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी दाखल करा…

0

नवी दिल्ली l हाथरस येथील सामुहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. बलात्कार करून तरुणीची हत्या करणा-या सर्व तरुणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलीस, आरोग्य कर्मचारी तसेच सरकारी अधिकाऱयांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारी जनहित याचिका संभाजीनगर येथील नगरसेवक चेतन कांबळे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे

याचिकेवर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.मात्र या संपूर्ण प्रकरणात पोलीस, अधिकारी तसेच आरोग्य विभागाची भूमिका संशयास्पद राहिली आहे. पीडित तरुणीचा मृतदेह पोलिसांनी मध्यरात्री पेट्रोल टाकून जाळल्याने हे वलय अधिक गडद झाले आहे.

त्यातच या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने सर्वेच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रातून या प्रकरणातील अनेक पुरावे गायब करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने आपण ही याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे चेतन कांबळे यांनी सांगितले.बलात्कार प्रकरणात सरकारी रुग्णालयाने तयार केलेल्या वैद्यकीय अहवालात गडबड करण्यात आली असून आरोपींना संरक्षण देण्यात आले आहे. पीडितेच्या पुटुंबाने आक्षेप घेऊनही मृतदेहावर रात्रीच्या अंधारात अंत्यसंस्कार करण्यात आले.

उत्तर प्रदेश सरकारची सगळी यंत्रणा आरोपींना संरक्षण देण्यासाठी धावपळ करत होती. त्यासाठी पुराव्यांशी छेडछाड करण्यात आली. पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱयांनी मिळून हे कांड केल्याचा स्पष्ट आरोप विधिज्ञ विपीन नायर, अॅड. सतीश तळेकर यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here