वडील-भावाने रचला बहिणीचा डाव,15 वर्षांच्या गर्भवती मुलीचं केलं धडापासून शीर वेगळं l

0

शाहजहांपूर l गर्भवती मुलीची वडिलांनी भावाच्या मदतीने कुऱ्हाड घालून शीर धडापासून वेगळं करत हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

जन्मदात्या वडील आणि भावानेच मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी वडील आणि भावाला अटक केली आहे.

काय आहे प्रकार ?

लग्नाआधीच 15 वर्षांची युवती गर्भवती झाल्यामुळे संतप्त वडिलांनी कुऱ्हाडीनं आपला मुलीवर हत्या केली. हा प्रकार उत्तर प्रदेशातील शाहजहापूर भागात सिंधौली ब्लॉकमधील दुल्हापूर गावात घडला. वडील आणि भावाने धारदार शस्रानं डोक्यावर वार करून धडापासून शीर वेगळं केलं आणि त्यानंतर एका पोत्यात मृतदेह बांधून नाल्याजवळच्या खड्ड्यात पुरला होता.11 दिवसांनंतर खड्ड्यात मृतदेह मिळाल्याची सगळीकडे चर्चा सुरू झाली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपासाला सुरुवात केली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वडील आणि भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत युवतीचे वडील शेती करतात. त्यांची 15 वर्षांची मुलगी गर्भवती होती. लग्नाआधीच गर्भवती असल्याच्या रागातून त्यांनी आपल्या मुलीची हत्या केली.

24 सप्टेंबरला त्यांनी हत्या केल्यानंतर मृतददेह पोत्यात बांधून जमिनीत पुरला मात्र तिथे दुर्गंधी पसरायला लागल्यानंतर प्राण्यांती खड्डा उकरून काढल्यावर हा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here