सटाण्यात चव्हाण दाम्पत्याचे चालले तरी काय ……!

0

वेगवान न्यूज

सटाणा शहरासह बागलाण मध्ये कोरोनाचा अक्षरशः कहर सुरु आहे .आपल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये अथवा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक खेड्यातील नागरिक नियमांचे पालन करत असतांना सटाणा शहर मात्र पुढाऱ्यांच्या दबावामुळे प्रशासनाने अनलॉक करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात घातले आहे .या खरे तर प्रशासन जबाबदार की चव्हाण दाम्पत्याची दुटप्पी भूमिका ?

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सटाणा शहरासह बागलाणमध्ये कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने थैमान घातले आहे .परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी तत्काळ बागलाणला भेट देऊन उपाययोजना करण्याचे आदेश यंत्रणेला दिले .त्यात सटाण्यासारख्या जास्तीच्या लोकसंख्येच्या गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून नाशिकच्या धर्तीवर सटाणा शहरात सम-विषमचा नियम लागू करण्याचे आदेश दस्तूरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी दिले .प्रशासनाने देखील त्याचे काटेकोर अंमलबजावणी सुरु केली .त्याच्या नंतर सुरु झाला तो सम-विषमचा राजकीय खेळ …..तर दुसरीकडे प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी हा सर्व आंखो देखा हाल जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे .

चव्हाण दाम्पत्याची नौटंकी जनतेच्या मूळावर …!

चव्हाण दाम्पत्याच्या कथनी आणि करणी मध्ये नेहमीच फरक असल्याचे बागलाणकरांनी नेहमीच अनुभवले आहे .गेल्या चार दिवसांपूर्वी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली .त्या मागणीने प्रसिद्धी देखील मिळवली .पत्नीच्या प्रसिद्धी नंतर संजय चव्हाण यांनी थेट पत्नीच्या भूमिकेच्या विरुद्ध टोकाची भूमिका घेत .जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध मोर्चा काढून सम-विषमचे नियम गुंडाळा अन्यथा आम्ह्नीच ते गुंडाळू अशी भूमिका घेत प्रशासनाला आव्हान दिले.

एकीकडे प्रशासन जनतेच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करत असतांना दुसरीकडे चव्हाण दाम्पत्याच्या ही दुटप्पी भूमिका मात्र नक्कीच जनतेच्या मूळावर उठली आहे . वास्तविक शासन टप्प्या टप्प्यावर कोरोनाशी दोन हात करत जनजीवन पूर्व पदावर आणत असताना .दीपिका चव्हाण यांनी मात्र लॉक डाऊन वाढवण्याची मागणी केली आहे .याचा अर्थ बाजार पेठांमधील गर्दीवर निर्बंध आणा .म्हणजे पूर्वीसारखा लॉक डाऊन करून दुकाने बंद करा अशी त्यांची मागणी आहे .

तर त्यांच्या पतीने थेट त्यांच्या मागणीला अप्रत्येक्ष विरोध दर्शविला आहे .प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सम-विषमचे नियम लागू केले असतांना माजी आमदार दीपिका चव्हाण यांचे पती संजय चव्हाण यांनी मात्र नियम गुंडाळा आणि सर्व दुकाने सुरु करण्याची मागणी केली .वास्तविक चव्हाण दाम्पत्याची ही स्टंटबाजी व्यापारी अथवा जनतेला न परवडणारीच आहे .

शासन कोरोनाशी सामना करत टप्प्या टप्प्याने सर्व व्यवहार पूर्वपदावर आणत आहे .आणि सौ.चव्हाण यांनी लॉक डाऊनची मागणी आता कोणालाही न परवडणारीच आहे.तर दुसरीकडे श्री चव्हाण यांनी सर्वच खुले करण्याची मागणीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास नक्कीच कारणीभूत आहे .त्यामुळे ही मागणी जनतेलाही नाही आणि व्यापाऱ्यांना देखील परवडणारी नाही .त्यामुळे चव्हाण यांनी आता अशा संकटकाळात तरी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी जनतेला उल्लू बनवू नये .एवढ सटाणा वासियांची अपेक्षा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here