ड्रग्जप्रकरण : A, R आणि S नामक सुपरस्टार अभिनेत्यांची चौकशी होणार, अक्षय कुमारच्या चाहत्यांची उडाली झोप…

0

मुंबई l निर्माता क्षितीज रवी प्रसाद याच्या अटकेनंतर ड्रग्ज प्रकरणात आणखी मोठी नावे समोर येणार, असे मानले गेले होते. आता एनसीबी A, R आणि S नामक सुपरस्टार अभिनेत्यांची चौकशी करू शकते, असे कळतेय.बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी रोज नवे खुलासे होत असताना आता एक वेगळीच तितकीच धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ माजली आहे.

याबाबत एबीपी न्यूजने वृत्त प्रसारीत केलं आहे. या सर्व अभिनेत्यांनी दीपिका पादुकोणसोबत काम केले होते. यापैकी A नावाचा अभिनेता स्वत: ड्रग्ज घेतो आणि दुस-यांनाही देतो.ड्रग्ज प्रकरणात A नामक सुपरस्टार कोण? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र का कुणास ठाऊक हे नाव समोर येताच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.

सोशल मीडियावर यावरून जोरदार चर्चा सुरु झाली आहे. काही लोकांच्या मते, A नावाचा हा अभिनेता दुसरा कोणी नसून अक्षय कुमार आहे. अशात अक्षय कुमारचे चाहते काल रात्रीपासून त्याचा बचाव करत मैदानात उतरले आहेत. सोशल मीडियावर यावरून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

एनसीबीने जप्त केलेत तब्बल 45 फोन
ड्रग्ज प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्धार करणा-या एनसीबीने आत्तापर्यंत 45 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या मोबाईल फोनमधून बॉलिवूडच्या ‘ड्रग्ज गँग’बद्दल मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. अनेक सेलिब्रिटींची नावे यातून समोर येण्याची शक्यताही वर्तवली जातेय.

‘न्यूज 18’ने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीने जप्त केलेल्या 45 मोबाईल पैकी 15 पेक्षा अधिक मोबाईल फोनचे फॉरेन्सिक रिपोर्ट एनसीबीला मिळाले आहेत. या आधारावर तपासाला नवी दिशा मिळाली आहे. एनसीबीने दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, करिश्मा प्रकाश आणि जया साहा यांचेही फोन जप्त केले आहेत. त्यांच्या मोबाईल फोनचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. यातूनही मोठा खुलासा होऊ शकतो. त्यांच्या मोबाईलचे रिपोर्ट चौकशीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून स्कॉटलँडमध्ये ‘बेलबॉटम’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी होता. नुकतेच त्याने या सिनेमाचे शेड्यूल संपवले.अक्षय कुमार व दीपिकाने एकूण 3 सिनेमांत एकत्र काम केले आहे. यात चांदनी चौक टू चायना, हाऊसफुल आणि देसी बॉईज या चित्रपटांचा समावेश आहे. शाहरूख खान स्टार ‘ओम शांती ओम’ या सिनेमात अक्षय कुमार कॅमिओ रोलमध्ये होता. या सिनेमातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here