ड्रग्ज प्रकरण – रकुल प्रीत सिंगची चार तास कसून तपासणी…

0

मुंबई l अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची चार तास आणि करिश्मा प्रकाशची सहा तास ड्रग्ज प्रकरणी आज एनसीबीने चौकशी केली. करिश्माला शनिवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. तिला दीपिका पदुकोण समोर बसवून एनसीबीचे अधिकारी चौकशी करणार आहेत.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग काल सकाळी एनसीबीच्या कुलाबा येथील गेस्ट हाऊसमध्ये चौकशीसाठी आली होती. चार तास चौकशीनंतर दुपारी दोन वाजता रकुल एनसीबीच्या गेस्ट हाऊस मधून बाहेर पडली. तर करिश्मा प्रकाशची एनसीबीने 6 तास चौकशी केली.

काही गोष्टीची चौकशी करणे बाकी असल्याने शनिवारी करिश्माची पुन्हा चौकशी केली जाणार आहे. एनसीबी दीपिका आणि करिश्माला समोरा समोर बसकून चौकशी करणार आहे. एनसीबीने दीपिकासाठी प्रश्नावली तयार केली आहे.आज 2017 मधील ड्रग्ज बाबतचे व्हॉट्स अप चॅट वायरल झाले आहेत. तर दुसरीकडे एनसीबीने धर्मा प्रोडक्शनचे निर्माते क्षितिज रवीची चौकशी केली. आज सकाळी एनसीबीचे पथक क्षितीजच्या वर्सोवा येथील घरी गेले.

त्यानंतर क्षितीज एनसीबीच्या पथकासोबत बेलार्ड पिअर कार्यालयात आले. क्षितिजची सायंकाळ पर्यंत चौकशी सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here