उद्धव ठाकरे ना उठा, शरद पवारांना शप म्हणायचे का?

0

“वर्षभर खुर्चीसाठी भांडायचं. सकाळी भाडायचं आणि दुपारी आपण भांडलो सरकार पडेल, मग भाजपा येईल असं म्हणून संध्याकाळी पुन्हा भाxडण्यासाठी आणि सरकार चालवण्याचा प्रयत्न वर्षभर झाला. यात सामान्य माणूस भरडला. हे गोंधळलेलं सरकार असल्याचं स्वरूप समोर आलं,” असं भाजपा नेते चंद्रकांत पाटील म्हणाले. तसंच चंपा, टरबूज्या असं म्हटलं जाऊ नये.

आम्ही देखील मर्यादा पाळतो. आम्ही त्या पद्धतीने बोलू शकतो. उद्धव ठाकरे ना उठा म्हणायचे का, जयंत पाटील यांना जपा म्हणायचे का? शरद पवार यांना शपा म्हणायचे का? पण आमची ही संस्कृती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

१३ महिन्यांपूर्वी निवडणुकी पूर्वी असलेली युती स्वाभाविकपणे अस्तित्वात यायला हवी होती. परंतु ज्यांना नाकारलं होतं ते सत्तेत आले. अकृत्रिमपणे निर्माण झालेल्या सरकारला १ वर्ष पूर्ण झालं आहे.

या वर्षभरात खुर्चीसाठी वाटेल तो अपमान सहन करणं, पण भाजप सत्तेत येईल या भीतीने पुन्हा एकत्र येणं असे प्रकार घडले आहेत.

हे संपूर्णपणे गोंधळलेले सरकार आहे. या वर्षभरात अनेक भ्रष्टाचार झाले. कोरोनातही भ्रष्टाचार झाले.

प्रत्येक भ्रष्टाचार बाहेर येईल. त्यांचे वाभाडे निघतील म्हणून हे सरकार अधिवेशन घाययला घाबरत असल्याचा आरोप चंद्रकात पाटील यांनी केला. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी अधिवेशन घेऊन दाखवाव, असंही ते म्हणालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here