ATM मधील पैसे संपल्यास हे करा ! तीन दिवस बँका बंद…

0

नवी दिल्ली l सलग तीन दिवस बॅंक बंद राहणार असल्याने एटीएममध्ये रोखीची कमतरता भासू शकते.
देशातील सर्व सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका (PSBs) आता दोन दिवसांनंतर उघडणार आहेत.

यामुळे सर्व बँकांमध्ये सोमवारी दुर्गापूजेच्या निमित्तानं बंद राहतील. शनिवारीसुद्धा बँका बंद होत्या. मात्र एटीएममध्ये पुरेशी रक्कम भरली असल्याचे बँकांकडून सांगण्यात आले आहे. तसेच सुट्टीच्या काळात एटीएममध्ये रोख रक्कम संपल्यास पुन्हा भरण्याचे काम सुरू ठेवले जाणार आहे. बँका वारंवार बंद असल्यानं आणि सणासुदीत एटीएममधून मोठ्या प्रमाणात पैसे काढल्यास रोखीची समस्या उद्भवू शकते.

ग्राहकांना रोख रकमेच्या समस्येपासून वाचवण्यासाठी जर एटीएममध्ये पैसे संपले तर पुन्हा एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आऊटसोर्सिंग एजन्सीची मदत घेतली जाणार आहे. त्याचबरोबर बँकांनी आपल्या कर्मचार्‍यांची खास पथकेही तयार केली आहेत.

जेणेकरून रोख रक्कम संपल्यावर एटीएममध्ये पुन्हा पैसे भरता येतील. या कालावधीत ऑनलाईन व्यवहार, यूपीआय, कार्ड पेमेंट यांसारख्या सुविधा कोणत्याही अडचणीशिवाय सुरू राहतील. त्याशिवाय एटीएममध्ये रोख उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी बँका ऑनलाईन माध्यमातून देखरेखही ठेवतील.दस-यापर्यंत रोख रकमेच्या अडचणीपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी सर्व बँकांनी विशेष व्यवस्था केली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) म्हटले आहे की, एटीएममध्ये रोख रक्कम संपल्यास कोणताही ग्राहक केबिनमध्ये दिलेल्या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून माहिती देऊ शकतो.

त्याचबरोबर बँक ऑफ इंडियाने (BOI) शुक्रवारी आपल्या सर्व एटीएममध्ये पुरेसे पैसे भरले आहेत. त्याचबरोबर BOIनेही टोल फ्री क्रमांकावर एटीएममधील रोख संपल्यास माहिती देण्यास सांगितले आहे. एकंदरीत सर्व बँकांनी महोत्सवाच्या काळात रोख रकमेच्या अडचणीपासून आपल्या ग्राहकांना वाचवण्यासाठी पुरेशी व्यवस्था केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here