गोरक्ष दलाच्या जिल्हाप्रमुखाची भरदिवसा हत्या

0

भोपाळ, 28 जून : गोरक्ष दलाच्या जिल्हाप्रमुखाची भरदिवसा हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गोरक्ष दलाचे जिल्हाप्रमुख रवी विश्वकर्मा यांच्या हत्येचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. 6 ते 7 जण त्यांच्या कारवर हल्ला करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. याच दरम्यान हल्लेखोरांनी गोळीबारही केला.

गोळीबारात रवी विश्वकर्मा यांचा मृत्यू झाला.

रवी विश्वकर्मा यांची वाट अडवून हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पिपरिया पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीश अंधवान यांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वकर्मा यांना दोन गोळ्या लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here