पुन्हा डिझेल भडकलं नवीन दर 81.05 रुपयांवर…

0
संग्रहीत

नवी दिल्ली l गेल्या महिन्यातही डिझेलच्या दरानं पेट्रोलच्या दराला मागे सोडलं होतं, आज पुन्हा एकदा नवी दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झालं आहे.

ऑयल मार्केटिंग कंपनी (ओएमसी) ने सोमवारच्या डिझेलच्या दरात 11 पैसे प्रतिलिटरच्या वाढ केली आहे. या वाढीनंतरच्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये डिझेलच्या भाव वाढला आहे. दिल्लीत एक लीटर डिझेलचा दर 81.05 रुपये प्रति लीटरवर आला आहे. पेट्रोलचे भावामध्ये कोणत्याही वाढीची नोंद झालेली नाही. पेट्रोलची किंमत 80.43 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहे. त्यानुसार रविवारी तेल कंपन्या डिझेलच्या दरात 16 पैसे प्रति लीटर वाढ केली.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे भाव समसमान पातळीवर आले आहेत, तर कधी डिझेल पेट्रोलपेक्षाही जास्त भाव खात आहे. प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर वेगळ्या स्थानिक विक्रीची कर किंवा मूल्य वर्धित कर (व्हॅट) लावला जातो. या कारणास्तव राज्यानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात.

पेट्रोलच्या दरात 29 जूनला बदल झाला होता. गेल्या 5 आठवड्यांत डिझेलचा दर 25 वेळा आणि पेट्रोलचा दर 21 वेळा वाढला आहे. 7 जूनपासून आतापर्यंत पेट्रोल 9.17 रुपये आणि डिझेल 11.66 रुपयांनी महागलं आहे. पेट्रोल आणि डिझेलवर विविध राज्य सरकारांकडून अबकारी कर तसेच व्हॅट यांची आकारणी केली जाते.

त्यामुळे इंधनाच्या जाहीर झालेल्या दरांपेक्षा प्रत्येक राज्यामध्ये अधिक रक्कम ग्राहकांना मोजावी लागते. पेट्रोल व डिझेल हे जीएसटीखाली आणण्याची मागणी केली जात असली तरी अनेक राज्यांचा त्याला विरोध आहे.

बदलत्या किमती

दिल्ली- पेट्रोल 80.43 रुपये आणि डिझेल 81.05 रुपये लिटर
कोलकाता- पेट्रोल 82.10 रुपये आणि डिझेल 76.17 रुपये लीटर आहे.
चेन्नई- पेट्रोल 83.63 रुपये आणि डिझेल 78.11 रुपये लीटर आहे.
नोएडा- पेट्रोल 81.08 रुपये आणि डिझेल 73.0 रुपये लीटर आहे.
गुरुग्राम- पेट्रोल 78.64 रुपये आणि डिझेल 73.19 रुपये लीटर आहे.
लखनऊ- पेट्रोल 80.98 रुपये आणि डिझेल 72.91 रुपये लीटर आहे.
पाटणा- पेट्रोल 83.31 रुपये आणि डिझेल 77.89 रुपये लीटर आहे.
मुंबई- पेट्रोल 87.19 रुपये आणि डिझेल 79.27 रुपये लीटर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here