नाशिक – उमराणा येथे करोनाचा शिरकाव; देवळा तालुक्यातील रुग्णसंख्येत वाढ

0

वेगवान न्यूज/मनोज वैद्य

दहिवड – नाशिक जिल्ह्यातील कांद्याची मोठी बाजारपेठ व देवळा तालुक्यात व्यापारी दृष्ट्या महत्वपूर्ण अशा उमराणा या गावात करोना आजाराने शिरकाव केला असून उमराणा येथील एका ६० वर्षीय महिलेचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती देवळा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी वेगवान न्यूजला दिली.

याबत सविस्तर वृत्त असे की उमराणा येथील एका ६० वर्षीय महिलेला ताप इतर त्रास जाणवू लागल्याने नाहीत येथील खासगी दवाखान्यात काही दिवसांपूर्वी ऍडमीट केले होते, सदर महिलेचे घश्याचे स्वॅब तपासले असता रात्री उशिरा त्यांचा रिपोर्ट हा करोना पॉझिटिव्ह आला असून तालुका प्रशासनाने त्या महिलेच्या आजूबाजूचा परिसर प्रतिबंदीत केला असून उमराणा परिसरातील जनतेने काळजी घेण्याचे आव्हान वेगवान न्यूजच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here