नाशिक – देवळ्यात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह; तालुक्यातील रुग्ण संख्या ८ वर

0

वेगवान न्यूज / मनोज वैद्य
दहिवड l रात्री उशिरा प्राप्त रिपोर्ट नुसार देवळा येथे पुन्हा २ रुग्ण करोना पॉझिटिव्ह सापडले असून त्यात ३८ व ३५ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.or

याबाबत सविस्तर वृत्त असे की, देवळा तालुक्यातील दिनांक २८जून रोजी आलेल्या अहवालात देवळा येथिल एक पुरुष जो नगरपालिका देवळा येथे वसुली विभागात कामाला आहे तो व खुंटेवाडी येथील मूळचा नाशिक येथून आपल्या मामाच्या गावाला आलेला १३ वर्षीय मुलगा करोना पॉझिटिव्ह आले होते.

त्या रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील १३ व्यक्तींचे स्वॅब काल घेण्यात आले होते त्यापैकी संध्याकाळी जे ७ अहवाल प्रशासनास प्राप्त झाले त्यात देवळा येथील रुग्णाच्या संपर्कातील ३ महिलांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले व ६ रिपोर्ट येणे बाकी होते. ते ६ रिपोर्ट रात्री उशिरा प्रशासनास प्राप्त झाले त्यात २ पुरुष करोना पॉझिटिव्ह आले असून ४ निगेटिव्ह आले आहेत. आज सकाळी गुंजाळनगर येथील एक, संध्याकाळी देवळ्याच्या तीन महिला, व आता २ पुरुष म्हणजे आज ६ जण पॉझिटिव्ह आले, आजचे ६ व पहिले २ असे एकूण ८ जण देवळा तालुक्यात पॉझिटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी आमचे प्रतिनिधी मनोज वैद्य यांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here