नाशिक – दिलासादायक; देवळा तालुक्यात कोरोना साखळी रोखण्यात प्रशासनाला यश २८ पैकी २० रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले

0

वेगवान न्यूज/ मनोज वैद्य
दहिवड l कोरोनामुक्त असलेल्या देवळा तालुक्यात अवघ्या आठ-दहा दिवसांत मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळल्याने सामान्य नागरिकांचे आणि प्रशासनाचेही धाबे दणाणले होते. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या २८ पर्यंत जाऊन पोहोचली आणि आता पुढे काय? ही चिंता सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसू लागली. मात्र सुरुवातीला ज्याप्रमाणे देवळा तालुका कोरानामुक्‍त ठेवण्यात प्रशासनाने यश मिळवले होते, त्याचप्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात व कोरोना साखळी रोखण्यातही प्रशासनाला चांगलेच यश आले आहे.

राज्यभरात कोरोनाचं थैमान सुरु असताना देवळा तालुका वासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकीकडे राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना देवळारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
देवळा तालुक्यात २९ मे ला दहिवड येथील युवक कोरोनाबाधीत आढळून आला होता तेव्हा देवळा तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला होता त्यानंतर त्या युवकाच्या संपर्कातील दहिवड येथील एक वृद्ध पुरुष कोरोना बाधीत आढळून आले होते त्यानंतर वैद्यकीय उपचारानंतर दोघेही कोरोनामुक्त होऊन घरी परतले आणि देवळा तालुका कोरोना मुक्त झाला त्यानंतर एक महिना देवळा तालुक्यात एकही कोरोना रुग्ण नव्हता २८ जून ला देवळा शहरात व खुंटेवाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आल्याने तालुक्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आणि अवघ्या आठ-दहा दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या २६ वर जाऊन पोहचली होती परंतु प्रशासनाने केलेली कामगीरी व पेललेली यशस्वी जबाबदारी तर नागरिकांनी प्रशासनाला केलेले सहकार्य या जोरावर तालुक्यात कोरोना साखळी रोखण्यात यश आले आहे.
आरोग्य विभागाने कोरोना बाधीत रुग्णांवर केलेल्या यशस्वी उपचारामुळे देवळा तालुक्यातील २० कोरोनाबाधित रुग्ण हे पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत त्यामुळे २८ पैकी आता २० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देवळा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी होऊन ७ वर आला आहे यामध्ये दोन कोरोना बाधीत रुग्ण देवळा येथील कोविड सेंटरला तर एक रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे आणि चार रुग्णांना घरीच विलगीकरण करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका आरोग्यधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी दिली आहे. यामुळे देवळा तालुकावासीयांसह प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान दुर्दैवी बाब म्हणजे देवळा शहरातील ७० वर्षीय महिलेचा नाशिक येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे यामुळे देवळा तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका रुग्णांची नोंद झाली आहे.
या कोरोनामुक्त झालेल्या २० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना देवळा तालुक्याला ही एक सकारात्मक बाब आहे.

देवळा येथील कोविड सेंटरला उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी मिळालेल्या उपचार पद्धती,सोयी-सुविधा याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया

नागरिकांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्यामुळे देवळा शहराची तसेच तालुक्याची कोरोना साखळी रोखण्यात तालूका प्रशासनाला यश आले आहे. कोरोनाबाधीत रुग्णांवर देवळा कोविड केअर सेंटरला यशस्वी उपचार केल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले असून मात्र, नियमानुसार त्यांना काही दिवस होम क्वारंटाईन रहावं लागेल.

-डॉ.सुभाष मांडगे- देवळा तालुका वैद्यकीय अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here