गुजरात मधील चायनीज ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवा”

0

अहमदाबाद

गुजरात सरकार विकासाच्या नावाखाली केवाडियामधील शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी बळजबरी करत असल्याचा आरोप छोटू वसावा यांनी केला. केवाडियाच्या परिसरातील ६-७ गावांमधील जवळपास २५ हजार हेक्टर जमीन बळजबरी ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला.भारत-चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चीनविरोधी जनभावना जोर धरत असून चिनी सामानांवर बहिष्काराची मागणी वाढत आहे. यावर ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या परिसरातील जमीन अमेरिकी आणि चिनी कंपन्यांना देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गुजरातमधील भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रमुख आणि आदिवासी नेता छोटू वसावा यांनी भाजपावर निशाणा साधत, ‘जर भाजपा चिनी सामानाचा खरंच विरोध करत असेल तर आधी मेड इन चाइना असलेला स्टॅट्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे’ असं म्हटलं आहे.

चीन आपला शत्रू आहे. जर भाजपाचा चीनला खरंच विरोध असेल तर पहिल्यांदा स्टॅच्यू ऑफ युनिटी हटावावा, कारण तो मेड इन चाइना आहे. चीनचा विरोध करायचा असेल तर सुरूवात स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून करायला हवी”, असं छोटू वसावा अहमदाबाद मिररशी बोलताना म्हणाले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here