कोरोनाचा महाभयंकर टप्पा ! प्रत्येक 15 सेकंदाला होतोय एकाचा मृत्यू !

0

नवी दिल्ली l आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 7 लाख झाली आहे. अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिको हे सर्वात जास्त प्रभावी देश आहेत. या देशांमध्ये मृतांची संख्या सर्वात जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत 49 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर, 1 लाख 60 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर कायम आहे. सध्या परिस्थिती एवढी बिकट आहे की, प्रत्येक 15 सेकंदाला एकाचा मृत्यू होत आहे.

जगभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर कायम आहे. सध्या परिस्थिती एवढी बिकट आहे की, प्रत्येक 15 सेकंदाला एकाचा मृत्यू होत आहे.वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या 2 आठवड्यात जगभरातील आकडेवारीतून असे समोर आले आहे की, 24 तासांत 5900 लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ प्रत्येक तासाला 247 आणि प्रत्ये 15 सेकंदात एकाचा मृत्यू होत आहे.जगभरात आतापर्यंत 7 लाख 5 हजार कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 87 लाख आहे.

WHOच्या वतीने कोरोनाव्हायरसला 11 मार्च रोजी साथीचा रोग घोषित केले होते. आतापर्यंत जगभरात अमेरिका हा कोरोनाचा हॉट स्पॉट झाला आहे. येथे कॅलिफोर्निया, टेक्सास आणि फ्लोरिडासह अनेक राज्यात संक्रमणाचा प्रसार वाढत आहे. एका आकडेवारीनुसार अमेरिकेत दररोज 1000 हून अधिक संक्रमित लोक मरत आहेत.जगभरात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त रुग्ण हे ब्राझीलमध्ये आहेत. ब्राझीलमध्ये 24 तासांत 51 हजारपेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळून आले. ब्राझीलमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 28 लाखांच्या वर गेला. येथे एकाच दिवसात 1154 रुग्णांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ही संख्या 96,000वर गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here