कोरोनाचा कहर ! देशात 9 लाखांचा टप्पा ओलांडला !

0

नवी दिल्ली l गेल्या 24 तासांत तब्बल 28 हजार 498 कोरोनाबाधित केसेस समोर आल्या आहेत. देशात कोरोनानं थैमान घातले आहे. चौथ्या लॉकडाऊननंतर आर्थिक गाडी रूळावर आणण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊनच्या अटी काही प्रमाणात शिथील केल्या. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून कोरोनाग्रस्तांची संख्या भलतीच वाढली आहे. 

गेल्या 24 तासांत दुर्दैवाने 553 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती केंद्रिय आरोग्य विभागाने दिली आहे.भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 9 लाख 06 हजार 752 इतकी झाली आहे. 

देशात सध्या 3 लाख 11 हजार 565 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 5 लाख 71 हजार 460 रूग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या कितीतरी जास्त आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सुधारून आता तो 63.03 टक्के एवढा झाला आहे.

दुसरीकडे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. राज्यात सोमवारी 6 हजार 429 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून 1 लाख 5 हजार 637 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here