फक्त दोनशे रुपयात करोनाची चाचणी, तासाभरात मिळणार रिपोर्ट

0

मुंबईः

 करोनाच्या चाचणीसाठी खासगी लॅबमध्ये ४५०० शुल्क आकारलं जातं. मात्र, आता लवकरच कमी पैशात करोनाचं निदान करणं शक्य होणार आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) रिलायन्सच्या मदतीनं करोनाचं निदान करणारी किट विकसित करणार आहे. यासाठी दोघांमध्ये करारही झाला आहे.

करोनाचं निदान करणाऱ्या आरटी-लॅम्प कोविड- १९ टेस्ट किटविषयी (Reverse Transcriptase- loop Mediated Isothermal Amplification)परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर सी. मांडे यांनी ‘एएनआय’ला माहिती दिली. “कोविड-१९ आरटी-लॅम्प चाचणी न्युक्लिक अॅसिड आधारित आहे.

रुग्णांच्या घशातील अथवा नाकातील स्वॅबचा नमुना घेऊन ही चाचणी केली जाते. कृत्रिम टेम्प्लेटचा वापर करून ही चाचणी विकसित करण्यात आली आहे आणि तिचं प्रात्यक्षिकही यशस्वीरित्या झालं आहे,” असं मांडे यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here