कोरोना हवेतून पसरतो शास्त्रज्ञांनी दिला गंभीर इशारा

0

वृत्तसंस्थाः

कोरोनाची दहशत संपूर्ण जगावरती झाली आहे. यामुळे अनेक लोक रस्त्यावर आला आहे. कोरोना हे भारतावरील एक मोठं संकट असून याचा समान करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहे. मात्र यामध्ये अजून एक धक्कादयक बाब समोर आली आहे. 32 देशांच्या शास्त्रांनी आता कोरोना हवेतून पसरत असल्याचे म्हटलं आहे. तसा इशारा त्यांनी जागतिक आरोग्य (WHO) संघटनेला दिला आहे.  त्यामुळे आता येथून पुढे काय असणार हे मात्र अवघड आहे.

मागे जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) करोना व्हायरसचा प्रादुर्भाव कसा होतो यासंदर्भातील माहिती जारी केली होती. त्यानुसार हा विषाणू हवेतून पसरत नाही असा दावा करण्यात आला होता. WHO ने त्यावेळी असे स्पष्ट केले होते की, हा विषाणू शिंक, खोकला, कफ आणि बोलण्याच्या माध्यमातून पसरू शकतो.

मात्र आता  ३२ देशांच्या २३९ शास्त्रज्ञांच्या संशोधनात एका धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हवेच्या माध्यमातून करोना विषाणूचा प्रसार होत असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. करोना विषाणूचे छोटे छोटे कण हवेतही जिवंत राहतात आणि त्यामुळे लोकांमध्ये त्याचा संसर्ग होऊ शकतो असे म्हटल आहे.

‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये छापलेल्या एका रिपोर्ट्सनुसार, ‘शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत एक सविस्तर पत्र लिहलं आहे. करोना विषाणूचा प्रसार हवेतून होत आहे. त्याचे सर्व पुरावेही आहेत. त्यानुसार करोनाच्या विषाणूचे छोटे-छोटे कण हवेत तरंगतात. ते लोकांमध्ये करोनाचा संसर्ग होण्यास पुरेशे आहेत. त्यामुळे यावर पुन्हा एकदा संशोधन करण्याची विनंती आहे.’ हे पत्र सायन्टिफिक जर्नलमध्ये पुढील आठवड्यात प्रकाशित होणार आहे.

हवेच्या माध्यमातून करोना विषाणूचा प्रसार होत असल्याच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या दाव्यावर न्यूज एजेन्सी रॉयटरने जागतिक आरोग्य संघटनेकडे प्रतिक्रिया मागवली आहे. पण यावर WHO कडून कोणतेही उत्तर आलेलं नाही.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here