कोरोना : 24 तासांत 50 हजारहून अधिक नवे रुग्ण ! किती रुग्णाचा मृत्यू ?

0

नवी दिल्ली l गेल्या 24 तासांत देशात 52 हजार 972 रुग्णांची नोंद झाली तर, 771 रुग्णांचा मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी एकाच दिवसात 50 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, निरोगी रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढत होत आहे.

यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख 03 हजार 696 झाली आहे. यातील 5 लाख 79 हजार 357 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर 38 हजार 135 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या सगळ्या दिलासादायक बाब म्हणजे देशात तब्बल 2 कोटी लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

रविवारी एकाच दिवसात 3.18 लाख लोकांचा चाचण्या करण्यात आल्या. तर, देशात एकाच दिवसात जवळजवळ 41 हजार रुग्ण निरोगी झाले आहे. यासह एकूण निरोगी रुग्णांची संख्या आता 11 लाख 86 हजार झाली आहे. यासह देशाचा रिकव्हरी रेट 65.8% झाला आहे.

महाराष्ट्रात काय परिस्थिती l

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,महाराष्ट्रात रविवारी 9509 नवीन कोरोना रुग्ण सापडले. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 4 लाख 41 हजार 228 झाली आहे. 24 तासांत 260 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत 15 हजार 576 रुग्णांचा राज्यात मृत्यू झाला आहे. मात्र रविवारी नवीन रुग्णांपेक्षा निरोगी रुग्णांची संख्या सर्वात जास्त होती. एकाच दिवसात राज्यातील 9,926 रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात आला. त्याचबरोबर दिल्लीतील रिकव्हरी रेटही 89.6% झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here