भारतात पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्याचा कोरोनामुळे बळी !

0

नवी दिल्ली l कोरोना विषाणूने जगासह देशात थैमान घातले आहे.कोरोना विषाणूला रोखण्यासाठी वैज्ञानिक रात्रंदिवस काम करत आहे.महामारी कोरोनाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा बळी घेतला आहे.पहिल्यांदाच भारताचे केंद्रीय मंत्री Coronavirus ला बळी पडले आहेत.

11 सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी Tweet करून आपल्याला Corona चा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. अंगडी यांच्यावर गेले 2 आठवडे उपचार सुरू होते. बेळगावचे खासदार असलेले सुरेश अंगडी पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवत होते.Covid चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अंगडी यांना दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

11 सप्टेंबरला Tweet करून आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं त्यांनी कळवलं होतं. डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचं सांगत त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्या, असं आवाहनही केलं होतं. सुरेश अंगडी 2004 पासून बेळगावमधून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून येत आहेत.

11 सप्टेंबरला Tweet करून आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं त्यांनी कळवलं होतं. डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचं सांगत त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्या, असं आवाहनही केलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होती. उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. ते 65 वर्षांचे होते. सुरेश अंगडी यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली आहेत.

सुरेश अंगडी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते विलक्षण कार्यकर्ते होते, असं म्हटलं आहे. पंतप्रधानांनी केलेल्या Tweet मध्ये लिहिलं आहे की, “सुरेश अंगडी यांनी कर्नाटकात भाजपला बळकट करण्यासाठी खूप प्रयत्न केले. ते झोकून देऊन काम करणारे खासदार आणि मंत्री होते.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here