पैसे उकळण्यासाठी मृत्यू झाल्यावरही कोरोना रुग्णाला 2 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर!

0

कोलकाता l हॉस्पिटलचं बील वाढविण्यासाठी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याला दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलं असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. तर हॉस्पिटल प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.कोरोना विरुद्ध सरकारी हॉस्पिटलमधे डॉक्टर्स आणि कर्मचारी जीव धोक्यात घालून लढत आहेत. असं असतांनाच काही गंभीर प्रकार समोर येत आहेत.

31 ऑगस्टला हुगळी जिल्ह्यातल्या एका कोरोना रुग्णाला कोलकत्यातल्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. हॉस्पिटलने 47 हजारांचं बिल दिलं होतं. त्या आधी दोन दिवस रुग्णाचे नातेवाईक पेशंटला पाहू देण्याची विनंती करत होते. मात्र त्यांना पाहू दिलं गेलं नाही.

जेव्हा बिल जमा करण्यात आलं त्यानंतर लगेच डॉक्टरांनी रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या हॉस्पिटलविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे.

रुग्णाचं पोस्ट मार्टेमही करण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.मात्र हॉस्पिटल प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. गंभीर स्थितीत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तोपर्यंत त्यांची कोविड टेस्टही झाली नव्हती. इथे आल्यानंतर टेस्ट मध्ये ते पॉझिटिव्ह आढळून आले होते असं हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here