कोरोनामुळे पुढील १२ महिन्यात ८ लाख ८० मुलांचा जीव जाण्याची शक्यता

0

वृत्तसंस्था

दक्षिण आशियामध्ये खास करुन भारत आणि पाकिस्तानमध्ये ५ वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या ८ लाख ८० हजार मुलांचा आणि ३६ हजार मातांचा मृत्यू होण्याची शक्यता युनिसेफने व्यक्त केली आहे.

‘लाइव्स अपेडेंड हाऊ कोवीड-१९ थ्रेट्स द फ्यूचर्स ऑफ ६०० मिलियन साऊथ एशियन चिल्ड्रन’ या नावाने प्रकाशतील करण्यात आलेल्या अहवालामध्ये दक्षिण आशियामधील परिस्थिती संदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, भूटान, बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंका या देशांमधील परिस्थितीबद्दल या अहवालात भाष्य करण्यात आलं आहे.

भारताबरोबरच दक्षिण आशियामधील देशांमध्ये राहणाऱ्या लहानमुलांसंदर्भात बालकल्याण आणि मुलांसंदर्भातील विषयांवर जगभरामध्ये काम करणाऱ्या युनिसेफ (युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड) या संस्थेने चिंता व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here