अहमदनगर – सोनईत हॉटस्पॉट जाहीर

0

वेगवान न्यूज / राजेंद्र साळवे

नेवासा l तालुक्यातील सोनई गावात १० व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने सोनई गाव हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. गावात जाणारे सर्व रस्ते अडविण्यात आले आहेत. राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी गावात फिरून उपाययोजनेचा आढावा घेतला. यानंतर अधिका-यांशी चर्चा केली.

तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथून सोनई येथे आलेल्या एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांची कोरोना टेस्ट केली. यातील २० लोकांपैकी १० लोकांना कोरोनाची लागण झाली. यानंतर तहसीलदार रुपेश सुराणा यांनी रात्रीच सोनई गावात येऊन उपाययोजना चालू केल्या आहेत.

शुक्रवार (दि १० जुलै ) रोजी जलसंधारण मंत्रीशंकरराव गडाखयांनी सोनई गावात जाऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार रुपेश सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, शेवगाव पोलीस विभागाचे उप विभागीय अधिकारी मंदार जवळे, सोनई पोलीस ठाण्याचे सहायक अधिकारी जनार्धन सोनवणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here