अभिनेते अनुपम खेरच्या घरातही कोरोना घुसला !

0

मुंबई – शनिवारी अमिताभ आणि अभिषेक बच्चनला कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कोरोनाने साऱ्या जगात धुमाकुळ घातल्यानंतर आता बॉलिबुडमध्येही शिरकाव केला आहे. त्यानंतर आता बॉलिबुडचे जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला आहे.

अनुपम खेर यांच्या आई कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहे. त्यांना मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनुपम खेर यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली.

अनुपम खेर यांचा भाऊ, वहिनी आणि पुतनी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अनुपम खेर यांचीही चाचणी करण्यात आली होती. मात्र त्याची रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी यासंबंधी मुंबई महानगर पालिकेला ही माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here