corona अहमदनगर – नेवासा तालुक्यात गावासह प्रशासनाची उडाली झोप

0

वेगवान न्यूज / राजेंद्र साळवे
अहमदनगर l नेवासा तालुक्यातील सोनई येथे एकाच दिवशी १० कोरोना पॉझीटीव सापडल्याने व संपर्कात आलेले सुमारे 102 स्वॅब अहवालाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे संपुर्ण गावासह प्रशासनाची झोप उडाली आहे.

संपर्कात आलेले (शंकास्पद)सुमारे 165 च्या जवळपास लोकांचे अहवाल आज शनिवार दि.11-7-20 रोजी अपेक्षित असल्याने सर्वांच्या नजरा शासनाच्या अहवाला कडे आहेत,

गेल्या दोन दिवसापासुन आशा सेविका गल्ली बोळा व वाडी वस्तीवर जाऊन आरोग्य विषयी चौकशी तसेच थर्मल स्कॕनिंग द्वारे शरीराचे तापमान घेताना दिसत आहे.

माहीतीच्या अभावामुळे किंवा आडमुठे पनामुळे काही नागरीक माहीती देन्यास किंवा थर्मल र्कॕनींग सोशल डिस्टंस राखुन देण्यास मज्जाव करत असल्याचे बेल्हेकरवाडी रोड या ठिकाणी सेवेत असनार्या एका आशा सेविकेने खंत व्यक्त केली.अशिक्षित व्यक्ती प्रमानेच सुशिक्षित शासकिय यंत्रणे सोबत वावरनार्या एका व्यक्ती बरोबर शाब्दीक चकमक ही झाल्याचे एका आशा सेविकेने नाव न घेता स्पष्ट केले.

जनतेने घाबरुन न जाता प्रसंगाशी धैर्याने सामना करावयाचा व प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे असे वारंवार सांगितले जात असले तरी काही लोकांच्या आडमुठे धोरणामुळे परिस्थिती बिघडु शकते असेही बोलले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here