बीड- नगर-परळी रेल्वे च्या मार्गावरील प्रमुख ब्रीजच्या कामास प्रारंभ

0

वेगवान न्यूज / केशव मुंडे

बीड-

नगर-परळी रेल्वेमार्गाच्या सर्वात मोठ्या ब्रीजच्या स्टील गर्डरच्या वर्किंग ला सुरुवात झाली आहे. मेहकारी नदीवर हा ब्रिज आसल्याने त्यास मेहकरी ब्रिज म्हणतात..

2014 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोपीनाथ मुंडे यांनी स्वप्न पाहिलेल्या नगर-बीड- परळी या रेल्वेमार्गाच्या कामासाठी निधी देण्याची घोषणा प्रित्तम मुंडे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत पंकजा मुंडे यांच्या उपस्थित केली होती.

पंकजा मुंडे यांनी व खासदार प्रित्तम मुंडे यांनी सतत पाठपुरावा करत नगर ते बीड या मार्गावरील मातीकाम आणि छोट्या पुलांची कामे पूर्ण केली आहेत. बीड ते परळी या अंतरातील भुसंपादनाचे कामही पूर्ण झालेले असून वडवणीपर्यंतचे मातीकाम प्रगतीपथावर आहे.

आता या रेल्वेमार्गाच्या कामाचा पुढचा टप्पा म्हणून नगर येथून 29 मे पासून स्टील कामाच्या कन्स्ट्रक्शन युनिटला सुरुवात झाली आहे, त्यानुसार मध्य रेल्वेमधील सर्वात मोठा पूल असलेल्या मेहकरी ब्रीजवर स्टील गर्डर टाकण्यात येत आहे. अहमदनगरपासून अंदाजे 40 किलोमीटर अंतरावर हे काम सुरु आहे. त्यामुळे नगर ते बीड हा पहिल्या टप्प्यातील रेल्वेमार्ग लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोविड -19 संबंधित सर्व सुरक्षा व खबरदारी घेत या पुलाचे काम करण्यात येत आहे. सध्या या पुलाच्या कामासाठी 60 मजूर काम करत असून 2021 पर्यंत हा पूल पूर्ण होईल. बीड ते नगर या मार्गाला जोडणारा हा महत्वाचा पूल असल्याचेे  रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

बीड जिल्ह्यातील ब्रेकींग व महत्वाच्या बातम्यांसाठी वेगवान न्यूजच्या वेबसाईटला {अलावू } सबस्क्राईप करायला विसरु नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here