चीनचं धक्कादायक वक्तव्य l ‘भारताने आपली चूक सुधारावी’

0

नवी दिल्ली l भारत सरकारने बुधवारी 118 चिनी मोबाइल अॅप्सवर बंदी लावली. यामध्ये PUBG व्यतिरिक्त Baidu, APUS लॉन्चर प्रो सारख्या अॅप्सचाही समावेश आहे. भारताने चीनविरोधात घेतलेल्या निर्णयानंतर चीनची तंतरली आहे.भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या गंभीर तणावादरम्यान भारताने चीनवर आणखी एक डिजिटल स्ट्राइक केला आहे.

न्यूज एजंसी रॉयटर्सनुसार चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की ते चिनी मोबाइल अॅप बंद करण्यासाठी भारताने घेतलेल्या निर्णयाचा विरोध करीत आहे.

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने (Commerce Ministry) भारत सरकारच्या या निर्णयावर टीका केली आणि भारताला आपली चूक सुधारण्यास सांगितले आहे. भारत सरकारच्या या निर्णयामुळे चिनी गुंतवणुकदार आणि सेवा देणाऱ्यांच्या कायदेशीर हक्कांचे उल्लंघन केले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ता गाओ फेंग यांनी सांगितले की, चीनने भारताला आपली चूक सुधारण्यास सांगितले आहे.

PUBG या अॅपमध्ये चीनची कंपनी टेनसेंट होल्डिंस लिमिटेडचा भागभांडवल होते. जे अॅप बॅन करण्यात आले त्यामध्ये पबजी व्यतिरिक्त Baidu, कॅमकार्ड बिजनेस, वीचॅट रीडिंग, वूव मीटिंग- टेनसेंट, व्हिडीओ कऑन्फेंसिंग, स्मार्ट अॅप लॉक, अॅपलॉकसारख्या अॅप्सचा सहभाग आहे.भारताने डेटा सुरक्षाचे कारण देत बुधवारी प्रसिद्ध व्हिडीओ गेम PUBG सह 118 मोबाइल अॅप्सवर प्रतिबंध लावण्याची घोषणा केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here