चीनला मिरची झोंबली,भारतीय वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांवर घातली बंदी

0

वृत्तसंस्था

भारताने चीनचे 59 एप बंद केल्यानंतर चीनला राग आला असून यामुळे चांगलीच मिरची झोंबली आहे. चिनी सरकारने नवी खेळी करत भारतीय प्रसारमाध्यमं आणि वेबसाईट्स ब्लॉक केल्या आहेत. १५ जून रोजी पूर्व लडाखमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. या चकमकीत दोन्ही देशांचं नुकसान झालं असून भारताचे २० जवान शहीद झाले आहेत तर चिनी सैनिकही ठार झाले आहेत. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

चिनी सरकारचं मुखपत्र असणाऱ्या वेबसाईट्स तसंच वृत्तपत्रांमधील माहितीही भारतीय प्रसारमाध्यमांकडून दिली जात आहे. भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यातील चकमकीवरुन तणाव असताना भारतीय प्रसारमाध्यमं तेथील प्रत्येक घडामोडीची माहिती देत आहेत.

महिन्याचा पहिल्या दिवस, काय आहे तुमचं भविष्य, पहा आजचे राशी भविष्य

भारतीय टीव्ही चॅनेल्स सध्या आयपी टीव्हीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून आयफोन आणि डेस्कटॉपवर एक्स्प्रेस व्हीपीएन काम करत नाही आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी नागरिक फक्त व्हीपीएनच्या सहाय्याने भारतीय मीडिया वेबसाईट्स पाहू शकतात. पण चीनकडे तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत फायरवॉल उपलब्ध असून या माध्यमातून व्हीपीएनदेखील ब्लॉक केलं जाऊ शकतं.

चीनने भारतीय वृत्तपत्र आणि वेबसाईट्स ब्लॉक करण्याचा निर्णय भारताने ५९ अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या आधीच घेतला असल्याचं रिपोर्टमध्ये सांगितलं जात आहे. साऊथ चीन मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चीनने ब्लॉक करण्यात आलेल्या वेबसाईट्सची संख्या जवळपास १० हजार झाली आहे. यामध्ये सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप याशिवाय ब्लूमबर्ग, वॉल स्ट्रीट जर्नल, द न्यूयॉर्क टाइम्स यांचाही समावेश आहे.

काय म्हणतोय चीन
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी, भारताने उचललेल्या पावलानंतर चिंतेत असल्याचं म्हटलं असून परिस्थितीची पडताळणी सुरू असल्याचं सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here