मोठी बातमीःराष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पातून चीनची सुट्टी

0

नवी दिल्लीः  राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी होण्यास चिनी कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातूनही चिनी कंपन्यांना शिरकाव करण्यास मज्जाव केला जाईल, लडाखमध्ये सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी अ‍ॅपवरील बंदीपाठोपाठ चिनी कंपन्यांची आर्थिक कोंडी करण्याचा पवित्रा केंद्र सरकारने घेतला आहे. अशी घोषणा केंद्रीय रस्ते-परिवहन व राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केली.

चिनी कंपन्याऐवजी देशी कंपन्यांना महामार्ग प्रकल्पांमध्ये अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रक्रिया सुरू झालेल्या प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांचा सहभाग असेल तर नव्याने निविदा काढण्यात येतील. त्यासाठी अटी व शर्ती शिथिल केल्या जाऊ शकतात. तसे धोरण लवकरच केंद्र सरकार जाहीर करेल, असे नितीन गडकरी यांनी ‘पीटीआय’शी बोलताना स्पष्ट केले.

केंद्राने राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा ठपका ठेवत ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली आहे. आता नवे धोरण महामार्गाच्या प्रस्तावित प्रकल्पांसाठीच नव्हे, कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांनाही लागू केले जाणार आहे. कंपन्यांच्या सहभागासंदर्भात निविदांमधील शर्तीमध्ये बदल करण्यासाठी बैठक घेण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

भारतीय अ‍ॅप्सना संधी

भारत आता स्वताचे मनोरंजन असो इतर एप बनवू शकतो. आता आपल्या भारतीयांना यामध्ये चांगली संधी असून ही योग्य वेळ असल्याचे आता सर्व स्तरातून बोललं जात आहे.

केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. चिनी अ‍ॅप्सवरील बंदीसंदर्भात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यामुळे भारतीय बनावटीच्या अ‍ॅप्सना अधिक संधी मिळू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’चा संकल्प केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here