चीनची धोकेबाजी,गलवानमध्ये पुन्हा केले बांधकाम

0

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी, सैन्य मागे घेण्यासाठी भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चा सुरु आहे. पण त्याचवेळी चीनने गलवान खोऱ्यातील संघर्ष झालेल्या ठिकाणी पुन्हा बांधकाम केले आहे. सॅटलाइट फोटोवरुन चीनने संघर्ष झालेल्या भागात पुन्हा बांधकाम केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील हा तणाव निवळावा म्हणून भारताच्या परराष्ट्र खात्यातील पूर्व आशिया विभागाचे सहसचिव नवीन श्रीवास्तव व चीनचे परराष्ट्र महासंचालक वू जियांघाव यांच्यात बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. त्यावेळी चीनने तो भाग आपलाच असल्याचे रडगाणे गायला सुरुवात केली.

गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यावर जोर दिला. मात्र, त्यानंतर चीननं आता सैन्य देपसांग, दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये हलवलं आहे. चीन येथे सैन्य तळ उभारत असून, पुन्हा भारतीय लष्कराच्या गस्तीमध्ये अडथळे आणण्याच्या प्रयत्न करत आहे.

गलवान खोऱ्यातील सॅटलाइट फोटोमध्ये दिसणाऱ्या चिनी बांधकामाला लष्कराने दुजोराही दिलेला नाही किंवा ते फेटाळलेले सुद्धा नाही. मॅक्सार या स्पेस टेक्नोलॉजी कंपनीने २२ जून रोजी हे फोटो काढले आहेत. पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ चीनने बांधकाम केल्याचे यातून स्पष्ट दिसते. १७ जून ते २२ जून या कालावधीत हे बांधकाम करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here