चीन मध्ये पुन्हा कोरोनाचा कहर ! भारतात कोरोना रुग्णसंख्या वाढणार का?

0

नवी दिल्ली l चीनमधील एका शहरात पुन्हा कोरोना विषाणूने तोंड वर काढले आहेत. आतापर्यंत कोरोना विषाणूवर लस तयार झालेली नाही.मात्र पुन्हा चीन मध्ये कोरोनाने थैमान घातल्याने भारतातही कोरोना रुग्णामध्ये वाढ होणार का? हा येणारा काळ ठरवणार आहे.

चीनच्या पश्चिमेकडील शिनजियांगजवळील काशगरमध्ये 50 लाख नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार आहे. या भागामध्ये लक्षणे न दाखवणारे अनेक रुग्ण आढळून येत असल्याने एवढ्या मोठ्याप्रमाणात चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संपूर्ण भागामध्ये पुन्हा लॉकडाउन लागू करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.चाचण्यांना सुरुवात करण्यात आल्यापासून 137 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. झिंजियांगमधील आरोग्य अधिकार्‍यांनी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याचं सांगितलं आहे. एका कापड कारखान्यातील 17 वर्षीय तरुणी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे.

मात्र या मुलीला कोरोनाचा संसर्ग कसा झाला यासंदर्भातील तपास आरोग्य अधिकारी करत असल्याचे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. रविवारी दुपारपर्यंत चीनमधील या भागातील 28 लाखांहून अधिक नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारपर्यंत या भागातील 47 लाख नागरिकांच्या चाचण्या पूर्ण करण्यात येतील अशी अपेक्षा सरकारी अधिकार्‍यांना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here