पतंजलीला केंद्र सरकारचे आदेश,करोनावरील औषधाची जाहिरात बंद करा

0

नवी दिल्लः

पतंजलीनं करोनावर आयुर्वेदिक औषध शोधून काढलं आहे. हे औषध करोनावर गुणकारी असल्याचा दावा पतंजलीनं केला आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष सध्या करोनाच्या औषधाकडे लागलं आहे. हे औषध पतंजलीनं बाजारात आणलं खरं पण त्वरीत केंद्र सरकारनं करोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश पतंजलीला दिले आहेत.

हे औषध बाजारात आणण्यात आल्यानंतर पतंजलीनं त्यांची जाहिरात करण्यासही सुरूवात केली आहे. हे औषध घरपोच पोहोचवण्यासाठी अॅप आणण्याची तयारी पतंजलीकडून सुरू असतानाच केंद्र सरकारकडून पतंजलीला मोठा धक्का बसला आहे.

केंद्र सरकारनं पतंजलीला करोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले आहेत. “या औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवण्यात यावी, असं केंद्र सरकारनं पतंजलीला दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. देशात आणि जगभरात करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यावर घाई न करता व्यवस्थित चाचणी होई पर्यंत आपण ही जाहिरात बंद करावी असे आदेश दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here