केंद्र सरकारने अजून चीनच्या ४७ अ‍ॅप्सवर घातली बंदी !

0

नवी दिल्ली l आता पुन्हा ४७ अप्सवर बंदी घालत केंद्र सरकारने चिनी टेक कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे.भारताने यापुर्वी चीनच्या 59 अ‍ॅप्सला बंदी घाली होती जसे चिनी अ‍ॅप टिकटॉक बॅन झाल्यानंतरही टिकटॉक लाइट म्हणून ते सुरूच होते.त्यात टिकटॉक, शेअरइट, कॅमस्कॅनर सारख्या लोकप्रिय अ‍ॅपचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त भारत सरकारने आणखी 275 चिनी अ‍ॅप्सची यादीही तयार केली आहे. हे अ‍ॅप्स राष्ट्रीय सुरक्षा आणि युझर्सच्या प्रायव्हसीसाठी सुरक्षित आहेत का, यासंदर्भात सरकार तपासणी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपन्यांचे सर्व्हर चीनमध्ये आहेत. सर्वप्रथम त्यांच्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे

वृत्तस्थळाच्या माहितीनुसार, तयार करण्यात येत असलेल्या अ‍ॅप्समध्ये काही गेमिंग चिनी अ‍ॅप्सचाही समावेश आहे. त्यांच्यावर बंदी घातली जाऊ शकते. या अ‍ॅपच्या यादीत झाओमीने तयार केलेले झिली अ‍ॅप, ई-कॉमर्स अलिबाबाचे अलिएक्स्प्रेस अ‍ॅप, रेस्सो अ‍ॅप आणि बाईट-डान्सच्या यू-लिंक अ‍ॅपचाही समावेश आहे.

चीनच्या अ‍ॅप्सचा सतत आढावा घेण्यात येत आहे आणि त्यांना कोठून अर्थसहाय्य मिळते, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, काही अ‍ॅप्स राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी धोकादायक असल्याचे दिसून आले.

तर काही अ‍ॅप्स डेटा वाटप आणि गोपनीयता नियमांचे उल्लंघन करीत आहेत. भारत सरकार आता अ‍ॅप्ससाठी नियम व कायदे तयार करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here