केअर सेंटरला भीषण आग, 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा होरपळून मृत्यू !

0

विजयवाडा l आज आंध्र प्रदेशातील विजयवाडा परिसरात एका हॉटेलमध्ये आगीचं रौद्र रुप पाहायला मिळालं. काही क्षणांत संपूर्ण हॉटेल आगीच्या भक्षस्थानी आल्याचं पाहायला मिळालं.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीची भीषणता किती मोठी होती ही या व्हिडीओमधून आपल्याला दिसेल.

एकीकडे कोरोनाचं महासंकट असताना अनलॉक 3 मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत 7 कोरोनाग्रस्त रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विजयवाडा इथे स्वर्ण पॅलेस नावाचं हॉटेलचं कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी केअर सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आलं होतं.त्यात 30 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे.अग्निशमन विभागानं दिलेल्या माहितीनुसार 7 कोरोनाग्रस्त रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 30 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. स्वर्ण पॅलेस या हॉटेलचं रुपांतर कोविड-19 केअर सेंटरमध्ये करण्यात आलं होतं.

इथे 30 रुग्ण आणि 10 स्टाफ असे लोक होते. त्यापैकी 7 जण आगीच्या भक्ष्यसाठी आले आहेत.ही आग ग्राऊंड फ्लोअरवर लागली असून तिथून आगीनं रौद्र रुप घेतल्यानं वेगानं पसरत गेली आणि संपूर्ण हॉटेलमध्ये अग्नितांडव झाला. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठले आहेत. रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मात्र आगीचं कारण अजून गुलदस्त्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here