देवळाली कार्यक्षेत्राच्या घटना व्यवस्थापकपदी कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार

0

नाशिकः

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांची देवळाली कॅन्टोमेंट कार्यक्षेत्रासाठी घटना व्यवस्थापक व प्रमुख समन्वयक म्हणून नियुक्ती केल्याचे आदेश, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पारित केले आहे.

श्री. कुमार यांना देवळाली येथील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने कंटेनमेंट झोनमधील तसेच अन्य इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार सर्वेक्षण पूर्ण करुन त्यामध्ये आढळून आलेल्या संभाव्य रुग्णांवर वैद्यकीय निगराणी ठेवण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांसाठी त्रिस्तरीय आरोग्य व्यवस्था स्थापित करण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत.

रुग्णांना आवश्यकतेनुसार रुग्णालयातील सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची सेवा अधिग्रहीत करण्याची किंवा इतर विभागांकडून उपलब्धतेनुसार प्राप्त करुन घेता येणार आहे. तसेच शहरातील रुग्णालयांशी समन्वय ठेवून आवश्यक कार्यवाई करण्याचे अधिकारी अजय कुमार यांना देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here