ब्रेकिंग : एन्काऊंटर नंतर विकास दुबेच्या 2 साथीदारांना मुंबईत अटक !

0

मुंबई l कानपूर पोलिसांनी शुक्रवारी विकास दुबे याचा एन्काऊंटर केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी मुंबईत विकास दुबेच्या दोन साथिदारांना मुंबई दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली आहे.

अरविंद उर्फ गुडड्न रामविलास त्रिवेदी वय-46 आणि सुशिलकुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी (गुड्डनचा ड्रायव्हर) अशी आरोपींचा नावं आहेत. महाराष्ट्र एटीएसनं ही कामगिरी केली आहे तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी दोन्हा आरोपीच्या मुंबईतून मुसक्या आवळल्या आहेत.

दरम्यान, 3 जुलैला मध्यरात्री उत्तर प्रदेशातील कानपूरमधील बिकरू गावात गँगस्टर विकास दुबे याला अटक करण्यासाठी पोलिस पथक गेलं होतं. विकास दुबे आणि त्याच्या साथिदारांना पोलिसा पथकावर तूफान गोळीबार केला होता. त्यात पोलिस अधिकाऱ्यासह 8 पोलिस कर्मचाऱ्यांना मृत्यू झाला होता तर अनेक कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर विकास दुबे आणि त्याचे साथिदार फरार झाले होते.

हृद्यद्रावक म्हणजे विकास दुबेने आठ पोलीसांना ठार करुन एकावरती एक धर लावून पुरावा नष्ट करण्याच्या तयारीत असतांना दुबे आणि त्याच्या साथिदारांनी पळ काढला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here