कोरोनाच्या भीतीमुळे चित्रपटात असा घेणार बोल्ड फोटो !

0

मुंबई l कोरोनाच्या भीतीने बॉलिवूडमधलं शुटिंगही बंदच होतं. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही अटींवर शुटिंगला परवानगी देण्यात येत आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची मुख्य अट घालण्यात आली आहे.

आता मात्र निर्मात्यांची शुटिंग करताना कसरत लागत आहे. या शुटिंगच्या काळात इंटीमेट सीन करताना सगळ्यात जास्त अडचण येणार असून नियमांचं पालन करत दोघांनाही जास्त जवळ जाऊ न देता कसं शुटिंग करायचं असा प्रश्न निर्मात्यांना पडला आहे. अपारशक्ती खुरानाने वर एक फोटो शेअर करत त्याचा खुलासा केला आहे.

आता यापुढे असे सीन अशा प्रकारे शुट केले जाऊ शकतात असे संकेतच त्याने दिले आहेत. पण आपल्या चित्रपटाबद्दल तो निश्चिंत आहे. कारण त्याचा हा सीन लॉकडाऊन आधीच शुट झाला आहे. आता जर असा सीन शुट करायचा असेल तर असेच फेस शिल्ड लावावे लागतील असं त्याने म्हटलं आहे.अपारशक्तीचा नवा चित्रपट हेल्मेट रिलीज होण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी प्रनुतन बहलही असणार आहे.

अपारशक्तीने जो फोटो शेअर केला त्यात प्रनुतनही असणार आहे. त्याने दोन फोटो शेअर केले असून त्यात पहिला फोटो रोमँटिक सीनचा आहे. तर दुसऱ्या फोटोत दोघांच्याही चेहेऱ्यावर फेस शिल्ड लावण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here