कोणते बॉलीवूड सेलिब्रीटी रिया चक्रवर्तीला वाचवायला आलेत पुढे !

0

मुंबई l अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) अटक केली.असून तसेच न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.आता रियाला अटक होताच तिच्या समर्थनार्थ बॉलिवूड सेलिब्रिटीही पुढे आलेले आहेत.

“रियाला खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे,”

रियाची जवळची मैत्रीण क्रिकेट समालोचक शिबानी दांडेकर व शिबानीचा बॉयफ्रेंड अभिनेता फरहान अख्तर यांनी रियाला पाठिंबा दिला आहे. ‘रियाला खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे,’ असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सद्या रियाचे टिशर्ट चांगलेच गाजले आहे. टीशर्टवरचा हा कोट शेअर करत किंवा रिट्वीट केला आहे.या टिशर्टवर काय लिहिले आहे.- “रोझेस आर रेड, वायलेट आर ब्ल्यू, लेट्स स्मॅश द पेट्रिआकि, मी अँड यू” अशी वाक्य लिहिलेला रिया चक्रवर्तीने घातलेला टीशर्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतो आहे. याचबरोबर कॅप्शन मध्ये “जस्टीस फॉर रिया” असे हॅश टॅग वापरून ट्रेंड सुरू केला आहे.

या अनुराग कश्यप, शबाना आझमी, फरहान अख्तर, करिना कपूर खान, विद्या बालन, अशा सेलिब्रिटीजने रियाच्या टीशर्टवरची वाक्य आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करत रियाला पाठिंबा दर्शवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here