SBI मध्ये FD करणा-या ग्राहकांना मोठा झटका!

0

नवी दिल्ली l देशातील एसबीआयने फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयने 2 कोटींपेक्षा कमी असणाऱ्या रिटेल डोमेस्टिक टर्म डिपॉझिटवर 1-2 वर्षाकरता असणारे व्याज 0.20 टक्क्यांनी कमी केले आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. आता एसबीआयच्या एफडीवर मिळणारा फायदा कमी झाला आहे. नवीन व्याजदर 10 सप्टेंबर 2020 पासून लागू झाली आहेत.याआधी एसबीआयने 27 मे रोजी एफडीवरील व्याजदर कमी केले होते.

आपल्या देशात एफडी एक महत्त्वाचा गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून एफडीकडे पाहिले जाते.

एसबीआयच्या एफडीवर असणारे नवे व्याजदर-

१) 7 ते 45 दिवस – 2.90 टक्के

२) 46 ते 179 दिवस – 3.90 टक्के

३) 180 ते 210 दिवस – 4.40 टक्के

४) -211 दिवस ते 1 वर्ष – 4.40 टक्के

५) -1 ते 2 वर्ष – 4.90 टक्के

६) -2 ते 3 वर्ष – 5.10 टक्के

७) -3 ते 5 वर्ष – 5.30 टक्के

८) -5 ते 10 वर्ष – 5.40 टक्के

ज्येष्ठ नागरिक एफडी व्याजदर

१) -7 ते 45 दिवस – 3.40 टक्के

२) -46 ते 179 दिवस – 4.40 टक्के

३) -180 ते 210 दिवस – 4.90 टक्के

४) -211 दिवस ते 1 वर्ष – 4.90 टक्के

५) -1 ते 2 वर्ष – 5.40 टक्के

६) -2 ते 3 वर्ष – 5.60 टक्के

७) -3 ते 5 वर्ष – 5.80 टक्के

८) -5 ते 10 वर्ष – 6.20 टक्के

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल एफडी प्रोजेक्ट

एसबीआय वीकेअर योजना 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू आहे. त्याचप्रमाणे बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक एफडी प्रोजेक्ट ‘एसबीआय वीकेअर डिपॉझिट’ लाँच केले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या रिटेल टर्म डिपॉझिटवर 30 बेसिस पॉईंट्सचा अतिरिक्त प्रीमियम मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here