लंडन l कोरोनाव्हायरसने जगात थैमान घातले आहे. जगातील अनेक संस्था तज्ज्ञ कोरोना लसीसाठी रात्रंदिवस काम करत आहे. मात्र अंतिम टप्प्यात आलेल्या लढ्याला मोठा झटका बसला आहे. अॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लशीच्या (Oxford covid-19 Vaccine) मानवी चाचणीत सामील झालेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर ट्रायल थांबवण्यात आले आहे.
अॅस्ट्रॅजेनेका यांनी एक निवेदन जारी केले आहे, यात त्यांनी रुटीन म्हणून ट्रायल थांबवले असल्याचे सांगितले. चाचणीत सामील झालेल्या व्यक्तीच्या आजाराबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही आहे.या लसीला AZD1222 असे नाव देण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या मते, जगातील इतर लशींच्या चाचण्यांमध्ये ऑक्सफर्डची लस आघाडीवर होते.ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागून आहे.
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ऑक्सफोर्डची लस ही बाजारात येणारी पहिली लस असेल.AFPच्या वृत्तानुसार सध्या सुरू असलेली चाचणी जगभर थांबविण्यात आली आहे आणि स्वतंत्र तपासणीनंतरच ती पुन्हा सुरू होऊ शकते. लशीच्या तिसऱ्या टप्प्यात हजारो लोक सामील आहेत आणि बर्याचदा यासाठी अनेक वर्षे लागतात.
मुख्य म्हणजे ऑक्सफोर्ड कोरोना व्हायरस लसीची चाचणी थांबविण्याची ही दुसरी वेळ …
कोरोना लशीच्या या तिसर्या टप्प्यात अंदाजे 30 हजार लोकांचा समावेश आहे.ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “अशा मोठ्या चाचण्यांमध्ये व्हॉलेंटिअर आजारी पडण्याची शक्यता असते, मात्र काळजीपूर्वक तपासणी करण्यासाठी स्वतंत्र तपासणी करणे फार महत्वाचे आहे”. मुख्य म्हणजे ऑक्सफोर्ड कोरोना व्हायरस लसीची चाचणी थांबविण्याची ही दुसरी वेळ आहे.