केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कोरोना रुग्णांवर भारतात वापरणार हे नवं औषध !

0

नवी दिल्ली l कोरोनाची परीस्थिती पाहता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.जगासह देशात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर ‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाने करोना व्हायरसच्या उपचारपद्धतीमध्येही काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन औषध वापरायला परवानगी दिली आहे.

कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी हे औषध वापरलं जाणार आहे.ब्रिटनमध्ये केलेल्या संशोधनात डेक्सामेथासोन औषध करोनावर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे.

डेक्सामेथासोन हे औषध प्रामुख्याने संधीवात, अ‍ॅलर्जी, दमा आणि काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपचारासाठी वापरले जाते. हे औषध कोरोनावर सुद्धा प्रभावी ठरत आहे. डेक्सामेथासोन हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे. कोरोनामुळे गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात यावे असा सल्लाही WHO ने दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here