बीग ब्रेकींगः अमेरिकेने WHO बरोबरचे संबंध का तोडले, एवढा मोठा निर्णय का घेतला

0

वॉशिंग्टन : अमेरिका डब्ल्यूएचओपासून (World Health Organization) विभक्त, ट्रम्प सरकारने (American Government) अधिकृत पत्र पाठविले आहे. अमेरिका आता यापुढे जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने डब्ल्यूएचओला या संदर्भात आपला निर्णय अधिकृत पत्राद्वारे कळविला आहे.

WHOपासून विभक्त होण्याबाबत अमेरिकेकडून माहिती मिळाली आहे.अमेरिकन सिनेटचा सदस्य रॉबर्ट मेनेंडेज यांनी ट्विट करुन अधिकृत दुजोरा दिला आहे. ट्रम्प सरकारच्या निर्णयामुळे अमेरिका आजारी आणि एकाकी होईल, असे ते म्हणाले.

WHOला देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम रोखण्याची तातडीने अंमलबजावणी केली गेली. अमेरिकेचा आरोप आहे की डब्ल्यूएचओने चीनमधील कोरोना विषाणूची ओळख जाणूनबुजून साथीचा रोग जाहीर करण्यात उशीर केला. त्याचवेळी, डब्ल्यूएचओने चीनी सरकारच्या आदेशानुसार काम सुरू केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल महिन्यातच जागतिक आरोग्य संघटनेपासून विभक्त होण्याची घोषणा केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here