कोरोना : मुला-मुलीचं लग्न करतायं तर सावधान ! तुम्हाला 6 लाखांचा दंड भरावा लागू शकतो?

0

नवी दिल्ली l राजस्थानमधील भिलवाडामध्ये मुलाचे लग्न करणे चांगलेच महागात पडले आहे.त्यात लग्नाला येणा-यांनी आपल्या मृत्यूचं आंमत्रण दिलं आहे.या लग्नात सामील झालेल्या 16 जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे,

धक्कादायक म्हणजे… त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे तर 58 जणांना आयसोलेट करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने कुटुंबीयांविरूद्ध केवळ गुन्हा दाखल केलेला नाही तर तीन दिवसांत सहा लाख रुपयांहून अधिक दंड भरण्यासही सांगितले आहे.

लग्नासाठी राठी कुटुंबाने प्रशासनाची मंजुरी घेतली तेव्हा त्यांना जास्तीत जास्त 50 लोक लग्नात उपस्थित राहू शकतील या अटीवर परवानगी देण्यात आली,यादरम्यान राठीचा मुलगा रिझुलचे लग्न 13 जून रोजी शहरातील भदादा परिसरात झाले होते.

परंतु लग्नात त्यापेक्षा जास्त लोकांना बोलावण्यात आले. सर्वात मोठी समस्या तेव्हापासून सुरू झाली जेव्हा नवरदेवासह 16 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली. यापैकी एकाचा मृत्यू देखील झाला आहे.

लग्नात सामील झालेल्या 15 संक्रमितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि 58 लोकांना आयसोलेट करण्यात आले आहे. या प्रकरणात राज्य सरकारला आयसोलेशन वॉर्ड, आयसोलेशन सेंटर सुविधा, अन्न, तपासणी, वाहतूक व रुग्णवाहिका इत्यादी मदतीमुळे सुमारे 6,26,600 रुपयांचा महसूल तोटा झाला आहे. तहसीलदारांना तीन दिवसांत ही रक्कम गोळा करून मुख्यमंत्री मदत निधीमध्ये जमा करण्यास सांगितले आहे.

भीलवाडा मॉडेल’ बद्दल देशभर चर्चा झाली. कडक भूमिका घेत जिल्हा प्रशासनाने कुटुंबाविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम-51 आणि सामान्य लोकांचे जीवन धोक्यात घालण्यासाठी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here