बीड – केज तालुक्यातील दोघे कोरोनामुक्त !

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना कोरोनामुक्त होणार्‍यांच्या संख्येतही आता वाढ होत असल्याचे ही बाब जिल्हावासियांसाठी दिलासादायक मानली जात आहे.

0

वेगवान न्यूज / शरद गिराम

केज –

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना कोरोनामुक्त होणार्‍यांच्या संख्येतही आता वाढ होत असल्याचे ही बाब जिल्हावासियांसाठी दिलासादायक मानली जात आहे. कोरोनामुक्त झालेल्या आणखी दोघांना आज सायंकाळी रुग्णालयातून सुटी मिळणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी ही माहिती दिली.

कोरोनामुक्त झालेल्या केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथील 23 वर्षीय तरुण व केळगाव येथील 29 वर्षीय महिलेचा समावेश आहे. 19 मे रोजी त्यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर दोघांवरही डॉक्टरांच्या निगराणीखाली पहिला एक आठवडा बीड जिल्हा रुग्णालयात तर नंतर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार झाले. त्यांना कुठलीही लक्षणे नसल्याने आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दहा दिवस उपचार केल्यानंतर सुटी दिली जात आहे असेही डॉ. थोरात यांनी सांगीतले.

वाचा- लॉकडाउन वाढणार का? मोदीच्या ‘मन की बात’कडे भारताचं लक्ष

वाचा-घाबरण्याची गरज नाही – दिल्ली कोरोनाच्या चार पावलं पुढे आहे? अरविंद केजरीवाल यांचा दावा

वाचा- मान्सूनची वाटचाल कुठ पर्यंत -स्कायमेटने तर दिली वर्दी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here