बीड – कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेले धारुरमधील 53 जण होम क्वारंटाईन !

संपर्कात आलेल्या व्यक्तींपैकी 53 जणांना होम क्वारंंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी 32 जणांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

0

वेगवान न्यूज / शरद गिराम

केज, बीड –

धारुर शहरातील दुधियापुरा भागात कोरोनाग्रस्त आढळला असून तो रुग्ण मागील चार दिवसात संपर्कात आलेल्या व्यक्तींपैकी 53 जणांना होम क्वारंंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी 32 जणांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

बीड – कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेले धारुरमधील 53 जण होम क्वारंटाईन !

शहरात दुधियापुरा भागात 33 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. तो पाच दिवसापूर्वी औरंगाबाद येथून धारूरला आलेला होता. मागील पाच दिवसात त्या कोरोनाग्रस्त तरुणाचा संपर्क शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या 53 जणांना आरोग्य विभागाने होम क्वारंंटाईन केले आहे. त्यापैकी 32 जणांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here