बँक ऑफ महाराष्ट्राचे खासगीकरण होऊ देणार नाही ! कर्मचारी सेनेचे आज आंदोलन

0

नवी दिल्ली l बँक ऑफ महाराष्ट्र खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना आज बुधवारी आंदोलन करणार आहे. निती आयोगाने चार बँकांच्या खासगीकरणाची शिफारस केंद्र सरकारकडे केली असून त्यात बँक ऑफ महाराष्ट्राचा उल्लेख ठळकपणे करण्यात येत आहे.

याबाबतीत केंद्र सरकार मूग गिळून गप्प बसले असल्यामुळे बँकांचे ग्राहक क कर्मचाऱयांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

1832 शाखा असलेल्या या बँकेचा 86 वा वर्धापन दिन आज बुधकारी 16 सप्टेंबर रोजी साजरा होत आहे.महाराष्ट्राची अग्रणी बँक असलेल्या महाराष्ट्र बँकेची स्थापना मराठी माणसांनी केली असून ही बँक बँकिंग क्षेत्रातील महाराष्ट्राची अस्मिता समजली जाते. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रथम क्रमांकाची बँक म्हणून पुरस्कार मिळालेल्या या बँकेतील 12 हजार 500 कर्मचारी, असंख्य निवृत्त कर्मचारी व सर्व कर्मचारी संघटनांमध्ये बँकेचे खासगीकरण करण्याच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना या खासगीकरणाकिरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्रातील सर्व खासदारांना निवेदन देणार आहे. तसेच बुधवारी कर्मचारी सेना आंदोलन करणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष नितीन रेगे व सरचिटणीस कृष्णकुमार पॉल यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here