पेरणीपूर्व मशागतीसाठी बळीराजा सज्ज !

0

वेगवान न्यूज / समीर पठाण

लासलगाव –

लासलगाव सह परिसरातील गावात बळीराजाने खरीपाची तयारी सुरु केली आहे.नांगरणी,वखरणी या सह अन्य मशागतीची शेतीकामे बळीराजाने सुरू केली आहे.कोरोना संकटाशी सामना करीत बळीराजा कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसुन येत आहे.

मागील पाच सात वर्षापासून शेतकऱ्यावर नैसर्गिक दुष्काळी संकट येत आहेत.परंतु बळीराजा अजुनही निसर्गाशी सामना करतो आहे.जमिनीची पोत,जडणघडण सुधारण्यासाठी पूर्वमशागतची कामे करताना दिसत आहे.कोरोना पार्श्वभूमीवर शेतकरी दोन महिने आपापल्या घरामध्येच होता.मात्र शेतकरी वर्गाने घरीच राहून चालणार नाही.शासनाने ही याकरिता कृषी क्षेत्राला काही नियम अटी लागू करून शेतीचे कामे व शेती पूरक व्यवसाय सुरू करण्याला मान्यता दिल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागत कामात व्यस्त आहे शेतकरी शेतातील काडीकचरा शेणखत नांगरणी असली कामे करत आहे खरीप हंगाम एक महिनाभरात आलेला आहे.

ज्यांच्याकडे बैल आहे,तो बैलाच्या साह्याने तर उर्वरित शेतकरी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी पंजी वखरणी, मोगडणी करत आहेत,सध्या गहू हरभरा ज्वारी यांच्या राशी झाल्या आहेत.लासलगाव सह टाकळी कोटमगाव पाचोरे निमगाव वाकडा मरळगोई खळक माळेगाव खानगाव थेटाळे रुई या गावात पेरणी पुर्वमशागती साठी बळीराजा सज्ज झाला आहे.

शेतकऱ्याचे आधुनिकत तंत्रज्ञानाकडे तंत्रज्ञानाकडे कल.

पूर्वीच्या काळात नांगरणीसाठी एक दोन नव्हे चार किंवा सहा बैलजोड्या असायची,मात्र आजकाल शेतकऱ्यांचा कल आधुनिकतेकडे वाढलेला दिसत आहे.बैलाची संख्या कमी होत आहे.पाऊसाचे प्रमाण जर त्या वर्षे कमी होत आहे,मग बैलजोडी सांभाळायचे म्हणले तर वर्षे भर चाराटंचाई जाणवते.त्यामुळे बैलजोडी अतिशय कमी शेतकरी ठेवत आहेत.ट्रॅक्टरने नांगरणी वखरणी,मोगडणे,पंजी ही कामे करून घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here